Anjali Damania SaamTv
Video

Anjali Damania : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यावर दमानिया ठाम; मुख्यमंत्र्यांना पाठवले पुरावे | Video

Dhananjay Munde News : सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यावरती अंजली दमानिया ठाम आहेत. त्यांच्यावर असलेल्या आरोपाचे पुरावे देखील दमानियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहेत.

Saam Tv

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 2 महीने पूर्ण झाले आहेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यावरती अंजली दमानिया अजूनही ठाम आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती आरोपाचे पुरावे देखील त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहेत. मात्र आजतरी ते चौकशी लाऊन राजीनामा घेतील का? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

धनंजय मुंडे हे जोपर्यंत मंत्रीपदावर आहेत, तोपर्यंत तपासावर दबाव राहाणार, तेव्हा त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. याबद्दल त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करून त्यात म्हंटलं आहे की, धनंजय मुंडेंवरच्या आरोपांचे पुरावे मुख्यमंत्री, लोकायुक्त, अजित पवार, निवडणूक आयोग, CBI, CAG आणि ACB ला पाठवत आहे. आज तरी ते चौकशी लावतील आणि राजीनामा घेतील अशी अपेक्षा आहे. जोपर्यत ते मंत्रिपदावर आहेत, तोपर्यंत दबाव राहणार. त्यांचा त्या स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या फोनचा डेटा अजून का रिट्रिव्ह झाला नाही? तो बडा नेता कोण आहे हे अजून का कळलं नाही? असे प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

गॅस सिलिंडरचा तुटवडा, हॉटेल व्यावसाय अडचणीत, अखेर घेतला मोठा निर्णय, वाचा नेमकं केलं काय?

Reliance 300 Billion Deal: मुकेश अंबांनींची अमेरिकेत ३०० अब्ज डॉलरची गुंतवणूक; सुरु करणार ऑइल रिफायनरी| VIDEO

LPG cylinder : कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद, कोल्हापूरमध्ये गॅस सिलिंडरची नेमकी स्थिती काय? वाचा

Gudi Padwa 2026 Time: गुढीपाडवा किती तारखेला आहे? तारीख, मुहूर्त, तिथी आताच नोट करा

SCROLL FOR NEXT