Nashik Farmers Block Highway Saam TV
Video

नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, महामार्गावर रास्तारोको

Nashik Farmers Block Highway: कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको आंदोलन करत शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

Namdeo Kumbhar

कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज नाशिकच्या चांदवडमध्ये आक्रमक पवित्रा घेतला. महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर तब्बल २ ते अडीच तास 'रास्ता रोको' आंदोलन केले. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात शेतकरी आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. पोलिसांनी मविआ नेत्यांसह अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे चांदवड परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळपासूनच चांदवड येथे शेतकरी मोठ्या संख्येने गोळा झाले होते. रणरणत्या उन्हात आणि तापलेल्या रस्त्यावर बसून शेतकऱ्यांनी 'चटणी-भाकरी आंदोलन' करत सरकारचा निषेध केला. आंदोलन सुरू असताना महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काही आंदोलकांनी महामार्गावर थांबलेल्या ट्रक्स आणि इतर वाहनांच्या टायरमधील हवा सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना रोखले, ज्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार राडा झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भीमाशंकर मार्ग बंद; माळीण परिसरात दरड कोसळली

IND vs ENG: टीम इंडिया 76 रन्सवर गारद! इंग्लंडविरूद्धच्या लाजीरवाण्या पराभवासाठी हे 5 खेळाडू जबाबदार

Rain Alert: राज्यात आजही अतिवृष्टी, वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज; पुढचे २४ तास महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नेरळ- भिवपुरीदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी, बदलापूर ते कर्जत वाहतूक ठप्प

Wednesday Horoscope: कौतुक होणार; ५ राशींच्या व्यक्तींच्या पैशांच्या समस्या सुटणार, वाचा आजचे खास राशीभविष्य

SCROLL FOR NEXT