Authorities investigate an alleged milk adulteration racket in Andheri West, Mumbai, following complaints from local residents. Saam Tv
Video

बाहेरून नामांकित ब्रँडच्या पिशव्या आत भेसळीचं दूध, नागरिकांच्या जीवाशी खेळ|VIDEO

Milk Adulteration Racket Exposed In Andheri West: अंधेरी पश्चिमेतील कपासवाडी परिसरात दूध भेसळ माफियांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भेसळयुक्त दूध विक्री केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Omkar Sonawane

मुंबईतील अंधेरी पश्चिमेतील कपासवाडी परिसरात दुधाच्या भेसळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वच्छतेचे कोणतेही नियम न पाळता दुधामध्ये घातक रसायनं आणि भेसळीचे पदार्थ मिसळून ते विक्रीसाठी तयार केलं जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणात नामांकित ब्रँडच्या पिशव्यांचा गैरवापर करून त्यामध्ये भेसळयुक्त दूध भरून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचं उघड झालं आहे. या दुधामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून, विशेषतः लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला असून, परिसरात संतापाची लाट उसळली आहे. दूध भेसळ माफियांनी आरोग्याशी खेळ मांडल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धुक्यामुळे रस्ता दिसला नाही, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Election: प्रशासनाचा भोंगळ कारभार; मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदी नियुक्ती

महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, पुण्यात भाजप ठाम शिंदेसेनेला घाम

Maharashtra Live News Update: ठाण्यात प्रमोद गोगावले यांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर.. परिसरात घोषणाबाजी

मुंबईत ठाकरेंची रणनीती ठरली? ठाकरेंच्या एकीनं महापालिकेत बळ वाढलं

SCROLL FOR NEXT