Police search operation underway at Prabhat Talkies area in Amravati after bomb threat; later confirmed as a hoax. Saam Tv
Video

Amravati News: अमरावतीत बॉम्बची अफवा, 'या' परिसरात शोधमोहीम सुरू, पोलिसांचा मोठा फौजफाटा|VIDEO

Police Deploy Bomb: अमरावतीतील सरोज टॉकीज परिसरात रविवारी बॉम्ब असल्याची अफवा पसरली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून परिसराची झाडाझडती घेतली.

Omkar Sonawane

अमरावती शहरातील प्रभात टॉकीज परिसरात बॉम्ब असल्याच्या अफवेने रविवारी संध्याकाळी मोठी खळबळ उडाली. पोलिस कंट्रोल रूमवर एका अज्ञात इसमाने कॉल करून सरोज टॉकीज परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती.

या कॉलनंतर घटनास्थळी तात्काळ बॉम्ब शोध पथक, श्वानपथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले. एसिपी व सिटी कोतवाली पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली परिसराची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, तपासणीत कोणताही स्फोटक पदार्थ आढळून आला नाही.

दरम्यान, या घटनेनंतर सरोज टॉकीज परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पोलीस आता कॉल करणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Price Today: सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात घसरण, १ तोळा सोनं १ लाख ५८ हजार रुपयांवर

रोहित पवारांच्या जीवाला धोका? पवार कुटुंबाला रोहित पवारांची काळजी

Pune News: हा कसला मुळशी पॅटर्न! 'सिकंदर शेख'वर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न, मुळशीत कुस्तीला गालबोट; पाहा VIDEO

शिवजयंतीला राज ठाकरेंना वाघनखांची भेट; आता याच वाघनखांनी सगळ्यांशी शेकहँड करतो|VIDEO

SCROLL FOR NEXT