Amol Kolhe Speech In Loksabha Over women reservation bill saam tv
Video

VIDEO : डोक्यावर फुले पगडी, लोकसभेत खासदार कोल्हेंचे मराठीतून तुफान भाषण

Amol Kolhe Marathi speech Lok Sabha women reservation bill reaction : शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला ठाम समर्थन देताना अंमलबजावणीच्या प्रामाणिकतेवर आणि सध्याच्या परिस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

Nandkumar Joshi

रोहिदास गाडगे, साम टीव्ही

लोकसभेत आज, गुरुवारी नारीशक्ती वंदन घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा झाली. या चर्चेत महाराष्ट्राच्या खासदारांनी सहभाग घेतला. डॉ. अमोल कोल्हे यांनीही महिला आरक्षणावर आपली भूमिका मांडली. डोक्यावर फुले पगडी घालून सभागृहात आलेल्या कोल्हे यांनी सुरुवातीलाच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या समाजकार्याचा उल्लेख केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना सुरुवातीपासूनच मतदानाचा अधिकार दिल्याचा उल्लेख करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले.

महाराष्ट्राच्या परंपरेचा उल्लेख करत त्यांनी जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांच्या वारशाचा गौरव केला. तसेच, महिला आरक्षणाला विरोध करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी शरद पवार यांनी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण दिल्याची आठवण करून दिली. मात्र, या विधेयकाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर देशातील महिलांवरील वाढते अत्याचार, बेपत्ता होणाऱ्या महिलांचे प्रमाण आणि अलीकडील भोंदूबाबांच्या प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नारी शक्ती वंदन विधेयकावर चर्चा होत असताना प्रत्यक्षात महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, अंमलबजावणी करणाऱ्यांच्या मानसिकतेवरही त्यांनी टीका करत, स्त्रियांच्या सन्मानाची खरी जाणीव आणि हेतू शुद्ध असणे गरजेचे असल्याचे ठामपणे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police: २ पोलिस अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन, पुणे पोलिस दलात खळबळ

Beauty Tips : आयब्रोज इतके पातळ की दिसतच नाहीत? फक्त हे ५ उपाय करा आणि पाहा कमाल!

EPFO : EPFO चा मोठा इशारा! PF खात्यात व्याज दिसत नाही? घाबरू नका; आधी ही महत्त्वाची माहिती वाचा

Urine Infection : पावसाळ्यात रोजच्या जेवणात 'ही' १ भाजी खा, युरिन इन्फेक्शनपासून होईल बचाव

Maharashtra News Live Update: पेपरफुटी प्रतिबंधक विधेयकावर दुपारी २ वाजता होणार मतदान

SCROLL FOR NEXT