Amol kolhe saam tv
Video

VIDEO : पक्षांतराच्या चर्चांवर खासदार अमोल कोल्हे काय म्हणाले, पवारांचे नाव घेत दिलं स्पष्टीकरण

Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हे यांनी पक्षांतराच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्यांनी थेट शरद पवार यांचे नाव घेतले.

Nandkumar Joshi

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे पक्षांतर करणार नाहीत, असा विश्वास ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर अमोल कोल्हेंनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. मी कुठेही जाणार नाही. राष्ट्रवादीतच राहणार आहे. शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असेल, असा ठाम निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गेल्याच महिन्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी एक गट केला होता. त्यानंतर काही तासांतच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरेंना हा मोठा धक्का होता. ठाकरेंचे आणखी काही आमदार फुटतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. यानंतर अमोल कोल्हेंच्या पक्षांतराच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. त्यावर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हे पक्षांतर करणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. तसेच स्वतः अमोल कोल्हेंनीही स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT