Amit Thackeray Saam Tv
Video

Amit Thackeray: शिवरायांच्या बाजूला PM मोदींचा फोटो कशाला?, संतप्त झालेल्या अमित ठाकरेंनी काढायला लावला फोटो; पाहा VIDEO

Amit Thackeray ON PM Modi: शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी पीएम मोदी यांचा फोटो पाहून मनसे नेते अमित ठाकरे आक्रमक झाले. त्यांनी हा फोटो काढून टाकण्यास सांगितला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर असून ते संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. अमित ठाकरे यांनी आज पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. यावेळी अमित ठाकरे यांनी मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांवरून त्यांना जाब विचारला. मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता हे पाहून अमित ठाकरे संतप्त झाले. शिवाजी महाराजांशेजारी पंतप्रधानांचा फोटो कशाला? असा जाब त्यांनी मुख्याध्यापकांना विचारला आणि आपल्या कार्यकर्त्यांना पीएम मोदींचा फोटो हटवण्यास सांगितला.

आज सकाळी अमित ठाकरे यांनी पुण्यातील शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी वसतिगृह येथील स्वच्छतागृह येथे असलेली अस्वच्छता, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा तसेच महाविद्यालयातील मेसमध्ये आढळून येणाऱ्या आळ्यांचे फोटो त्यांना दाखवले. तसेच कॅन्टीनमध्ये सडलेले कांदे पाहून अमित ठाकरे हे आक्रमक झाले. तेच सडलेले कांदे ते प्राध्यापक यांच्या कार्यालयात घेऊन गेले. यावेळी त्यांनी मुख्याध्यापकांना जर विद्यार्थ्यांना येथे आजच्या आज चांगल्या सोयी सुविधा तसेच चांगल जेवण मिळालं नाही तर आक्रमक आंदोलन करू असा इशारा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toxic Collection: यशच्या 'टॉक्सिक'ची क्रेझ ५ दिवसांत ओसरली? २०० कोटींची कमाई, पण रविवारी थिएटरमध्ये शुकशुकाट

Horoscope: सप्टेंबर महिन्यात ४ राशींवर होणार पैशांचा पाऊस; लॉटरीसारखा मिळणार फायदा, यात तुमची रास आहे का?

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मराठा आंदोलक यांची ४ वाजता भेट

Pune : पुण्यात प्रेमाचा भयंकर शेवट! कॉम्प्युटर इंजिनीअर तरुणीने संपवलं आयुष्य; बॉयफ्रेंडला बेड्या

Pm Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबर की नोव्हेंबर? शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT