nagpur news  saam tv
Video

Amit Shah Nagpur Tour: गृहमंत्री अमित शहा नागपूर दौऱ्यावर; तीन दिवस महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून, कारण काय? VIDEO

Amit Shah to Stay Overnight in Nagpur: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तीन दिवसाच्या दौऱ्यावर असून यामुळे राजकीय हालचालीना वेग आला आहे.

Omkar Sonawane

नागपूर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपूर दौऱ्यावर आले असून रात्री ते नागपूरमध्ये मुक्कामी असणार आहेत. त्यांचा मुक्काम शहरातील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये करण्यात आला आहे. या दौऱ्याचा उद्देश नागपुरात होणाऱ्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणे आणि आणखी एका भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणे असा असून, हे कार्यक्रम उद्या पार पडणार आहेत.

अमित शहा यांचे हॉटेलमध्ये आगमन झाल्यानंतर परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून, संपूर्ण भागाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील सध्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये उपस्थित असून, अमित शहा यांच्या सोबत थांबलेले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, अमित शहा हे नागपूर शहरातील काही पदाधिकारी, महामंत्री आणि स्थानिक नेत्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधणार असल्याचे समजते. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून, या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: ३ दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगे आक्रमक; उद्यापासून पाणीही सोडणार

Landslide: मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलन, १९ कामगार अडकले

Ganesh Mantra: गणरायाच्या एका मंत्राचा करा जप, सर्व संकटे होतील दूर

Manoj Jarange Patil Protest Live Updates: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंदोलकांना जेवणाची व्यवस्था

Hockey Asia Cup 2025 : भारताची कमाल, चीननंतर जपानचीही धूळधाण, दुसऱ्यांदा विजयाला गवसणी

SCROLL FOR NEXT