मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे दिल्लीसह देशभरात जोरदार आंदोलन सुरु आहे. यावरूनच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींवर जोरदार प्रहार केला. तुम्ही बनावट मीडिया इव्हेंटस आणि खोट्या गोष्टींचा गवगवा करून देशातील जनतेचा विश्वास जिंकू शकत नाही. केवळ 14 पक्षांचे कार्यकर्ते एकत्र करून आणि दीड किलोमीटरच्या परिसरात 8000 लोकांचा जमाव जमवून तुम्ही देशाचा आवाज बनू शकत नाही. देशात बिहार, उत्तरप्रदेश आणि तमिळनाडूसारलही अनेक राज्ये आहेत. जिथे लोकांनी अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षाला नाकारले असून दारुण पराभव केला आहे. पुढे अमित शाह म्हणाले की, मी राहुल गांधीना सांगू इच्छितो की त्यांनी 2029 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीए प्रचंड विजय मिळवणार आहे आणि काँग्रेस आणखी एका करत आहे. जो त्यांचा सलग चौथा पराभव असेल, असा जोरदार हल्लाबोल अमित शाह यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.