AIMIM corporators protest during the municipal corporation’s encroachment removal drive in Shahganj, Chhatrapati Sambhajinagar Saam Tv
Video

एमआयएमच्या १० नगरसेवकांचं पद जाणार? काय आहे कारण? VIDEO

AIMIM Corporators Protest During Encroachment Removal Drive: छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध केल्यामुळे एमआयएमच्या 10 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता. मनपा आयुक्त सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करणार असल्याने राजकीय संघर्ष तीव्र.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगर शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान महापालिका पथकाला विरोध केल्याने एमआयएमच्या दहा नगरसेवकाचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. ज्या नगरसेवकांनी अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान अतिक्रमण हटाव पथकाला विरोध केला, त्यांचं नगरसेवकपद रद्द करावं अशी शिफारस महानगरपालिका आयुक्त करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आता आयुक्त विरुद्ध एमआयएम नगरसेवक असा नवा संघर्ष सुरू झालाय. शहरातील शहगंज भागात महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटावची कारवाई सुरू असताना एमआयएमच्या नगरसेवकांनी हातगाड्या उचलण्याच्या कारवाईला विरोध करून अडथळा निर्माण केला होता. त्यावरून MIM च्या १० नगरसेवक आणि त्यांच्या ४ नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला होता.

इतकंच नाही तर महापालिका अधिनियमानुसार या नगरसेवकांविरोधात मनपा अधिनियम १० नुसार सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करीत त्यांना नोटिस बजावणार असल्याचं आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितलंय. तर आयुक्त हे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाची कटपुतली असल्याचा आरोप एमआयएम नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेत्यांनी केलाय. त्यामुळे आता अपात्रतेची शिफारसवरून महानगरपालिके मध्ये वाढणार असं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याणमध्ये दुचाकी चोरीचा पर्दाफाश, सराईत चोर अटकेत; १.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

BJP: मुंबई भाजपकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा, कुणावर सोपवली कोणती जबाबदारी? वाचा संपूर्ण लिस्ट

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jalgaon Crime: जळगावात 'खुनी राजकारण'! सरपंच-उपसरपंचाला चिरडण्याचा डाव; सुपारी घेऊन अंगावर घातली पिकअप

दारूच्या अड्ड्यावर भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये लाथाबुक्क्यांनी मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT