Raigad News Ambenali Ghat : पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस वाहतुकीसाठीसाठी बंद करण्यात आला आहे. रायगडमध्ये कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळं जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी हा निर्णय घेतला आहे. आज ३ जुलैपासून ६ जुलैपर्यंत आंबेनळी घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.
पोलादपूर - महाबळेश्वर राज्य महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी आज, ३ जुलैपासून ६ जुलै असे ४ दिवस पुढील आदेश येईपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. या मार्गावरील हलक्या वाहनांची वाहतूक पावसाच्या ऑरेंज आणि रेड अलर्टवेळी पूर्णपणे बंद राहील, असे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. या कालावधीत माणगाव-ताम्हाणी मार्गे पुणे-सातारा आणि पोलादपूर चिपळूण-पाटण-सातारा-कोल्हापूर अशी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.