Ambadas Danve News SaamTv
Video

Ambadas Danve : मुस्लिम उमेदवार देण्यावर अंबादास दानवेंचं मोठं विधान

Vidhansabha Election : विधानसभेत व मेरिटनुसार अल्पसंख्यांक म्हणजेच थेट मुस्लिम चहरेच उतरवण्याच्या तयारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. याबद्दल ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Saam Tv

लोकसभेत मुस्लिम मतं मिळाल्यानंतर आता विधानसभेत थेट मुस्लिम चहरेच उतरवण्याच्या तयारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. इलेक्टीव मेरिटनुसार अल्पसंख्यांक म्हणजेच मुस्लिम उमेदवार देणार असल्याचं विधान ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केलं आहे.

''हिंदुत्व म्हणजे मुसलमान नसणे असा अर्थ नाही. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. मुस्लिम विरोधात आम्ही नाहीत. शिवसैनिक म्हणून, संघटना म्हणून जर कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो फक्त त्याची विचारसरणी शिवसेनेची असेल तर त्याला संधी देऊ. मग तो अल्पसंख्यांक असो वा बहूसंख्यांक जे देशभक्त आहेत राष्ट्रभक्त आहेत समाजासाठी काम करणारे आहेत, त्यांना संधी दिली जाईल'', असं दानवे यांनी म्हंटल आहे.

दरम्यान, त्यांच्या विधानावर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. '' जर शिवसेना मुस्लिम उमेदवार देत असेल तर यात काही चुकीचे नाही. शिवसेना लोकशाहीला आणि संविधानाला मानणारा पक्ष आहे.'' असं ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिफ्टमध्येच बॉयफ्रेंडसोबत इंटिमेट झाली, KISS करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मुंबईतील महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Viral Video: होणाऱ्या नवऱ्याला पाहताच मंडपात नवरीच्या अश्रूंचा पूर; लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Motyacha Bangdya Designs : नऊवारी अन् पैठणीवर शोभून दिसतील मोत्याच्या बांगड्या, 'या' लेटेस्ट सुंदर डिझाइन्स एकदा पाहाच

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या, ९ वर्षांच्या मुलासमोरच घडला थरार

Rain Alert : महाराष्ट्रात उन्हाळा की पावसाळा? २ दिवस कुठे अवकाळी पावसाचा इशारा, तर कुठे कडाक्याच्या उन्हाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT