Yogendra Yadav Sabha Saam Tv
Video

Akola News: योगेंद्र यादव यांच्या कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा, तोडफोड करत खुर्च्या फेकल्या; पाहा VIDEO

Yogendra Yadav Sabha: अकोल्यात योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात 'लोकशाहीची सुरक्षा आणि आपलं मत' या चर्चेवर विचार सभा सुरु होती. या सभेत वंचितच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला.

Priya More

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यामध्ये भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या भाषणादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. योगेंद्र यादव यांचं भाषण वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडला. आज अकोल्यात योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात 'लोकशाहीची सुरक्षा आणि आपलं मत' या चर्चेवर विचार सभा सुरु होती. या विचार सभेत योगेंद्र यादव भाषण करत असताना वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या विचार सभेत गोंधळ घातला.

योगेंद्र यादव यांचं भाषण सुरू असताना त्यांचे भाषण बंद पाडलं. अकोल्यातल्या जिल्हा परिषदच्या कर्मचारी भवनमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. मोठ्या संख्येने वंचितच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर गोंधळ घातला आणि योगेंद्र यादव यांना घेरलं. संविधानाच्या दृष्टिकोनातून काय चर्चा झाल्या. त्यांना जाब विचारला जात आहे. 'जवाब दो, जवाब दो' असे नारे देत आहेत. स्टेजवर जात माईक, खुर्च्या आणि सामान खाली फेकून दिले.

अकोल्यातल्या आज 'लोकशाहीची सुरक्षा आणि आपलं मत' या चर्चेवर ही विचारसभा आयोजित करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र डेमोक्रेटीक फोरम आणि भारत जोडो अभियानाच्या वतीने या विचार सभेच आयोजन केले गेलं होत. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगेंद्र यादव होते. ज्यांची ओळख भारत जोडो अभियानाचे संयोजक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून अशी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lymph Node Health Problems: शरीराच्या 'या' 4 भागांमध्ये गाठ दिसल्यास असू शकतो गंभीर कॅन्सर; कसं कराल निदान?

Delhi Blast: 'इस्लाम में सुसाइड हराम पर बॉम्बिंग...', दिल्ली स्फोटापूर्वीचा दहशतवादी उमरचा VIDEO समोर

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला गळती, २ बड्या नेत्यांची भाजपमध्ये एन्ट्री

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्याचे मामेभाऊ अल्हाद कलोती नगरसेवक पदासाठी रिंगणात...

Famous Singer Death: प्रसिद्ध गायकाचे ३४ व्या वर्षी निधन; मृत्यूशी झुंज ठरली अपयशी, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT