शरद पवार आणि अजित पवार  saam tv
Video

Ajit pawar : शरद पवारांसोबत युती करायचीच, आता अजित पवार स्वत: मैदानात उतरले; राष्ट्रवादीतील मोठी अपडेट समोर

Ajit Pawar Sharad Pawar alliance talks latest news : पुणे महापालिका निवडणुकीतील जागावाटप फिस्कटल्यानंतर अजित पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी त्यांनी अमोल कोल्हेंसह वरिष्ठ नेत्यांशी थेट चर्चा सुरू केली आहे.

Namdeo Kumbhar

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात सुरू असलेली जागावाटपाच्या चर्चा शुक्रवारी फिसकटली. स्थानिक नेत्यांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोजक्याच जागा देण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यामुळे ही युती फिसकली होती. पण आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठीच अजित पवार मैदानात उतरले आहेत. आज सकाळी त्यांनी अमोल कोल्हे यांच्यासोबत चर्चा केली होती.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांनी स्वतः सूत्र हातात घेतली आहेत. अजित पवार स्वतः वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करत आहेत. अमोल कोल्हेसोबत चर्चेनंतर पुण्यातील प्रमुख राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक अजित पवारांनी रद्द केली. पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रबाबत अमोल कोल्हेशी चर्चा केल्यानंतर पुण्यातील स्थनिक नेत्यांनी चर्चा थांबवली. चतेन तुपे, सुनील टिंगरे, सुभाष जगताप यांच्यासोबत अकरा वाजता होणारी बैठक अजित पवारांनी रद्द केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मास्टर प्लॅन

शतप्रतिशत भाजपामुळे मित्रपक्षांनाही धक्का, भाजपने दाखवला मित्रपक्षांना हिसका

२५ वर्षांची सत्ता संपली! ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका का गेली?

मुंबईत महापौरपदासाठी शिंदेंची फिल्डिंग? शिंदेंना हवंय मुंबईचं महापौरपद?

Maharashtra Live News Update: पेण खोपोली मार्गावरील एचपी इंटरनॅशनल कंपनीत भीषण आग

SCROLL FOR NEXT