Ajit Pawar during his early morning inspection at the Beed District Sports Complex, interacting with local citizens. Saam Tv
Video

Ajit Pawar: जादूची कांडी नाही माझ्याकडं..., प्रश्नांचा भडीमार करणाऱ्या बीडकरांवर अजित पवार संतापले|VIDEO

Ajit Pawar Loses Cool in Beed: अजित पवार बीड दौऱ्यावर असताना नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारले असता त्यांनी संताप व्यक्त करत सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Omkar Sonawane

  • अजित पवार बीड दौऱ्यावर असताना नागरिकांवर नाराज झाले.

  • “माझ्याकडे जादूची कांडी नाही” असा संतप्त संवाद.

  • सहकार्य हवे असल्याचे स्पष्ट करत पालकमंत्रिपदाबाबत वक्तव्य.

  • पहाटेपासून दौरा सुरू करत विविध विकासकामांचा आढावा घेतला

बीड: जादूची कांडी नाही माझ्याकडे तुम्ही सहकार्य करा. मी सहकार्य करतो. नाहीतर मी जातो. घ्या पालकमंत्री कोणाला घ्यायचे ते असे म्हणत वेगवेगळे प्रश्न मांडणाऱ्या बीडकरांना अजित पवार यांनी संयमाचा सल्ला दिला. अजित पवार हे रात्री बीडमध्ये मुक्कामी होते. यानंतर पहाटे पावणेसहा वाजण्याच्या आधीच चंपावती क्रीडा मंडळाचा आढावा घेतला. त्यानंतर कंकालेश्वर मंदिराच्या विकासाच्या आराखड्याचा आढावा घेऊन ते थेट जिल्हा क्रीडा संकुलावर पोहोचले. या परिसरात असलेला कचरा पाहून दादांनी सर्वात आधी हा कचरा तिथून हटवत तेथे पार्किंग करण्याच्या सूचना केल्या. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले काही खेळाडू व ज्येष्ठ नागरिकांनी विविध सूचना, समस्या मांडल्या.

यावेळी अजित पवार यांनी याआधी तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिले त्यांनी काहीच केलं नाही. आता मला कोणाचे काही काढायचे नाही. परंतु मी करायला लागलो तर मलाच ढुसण्या मारायला लागले माझ्याकडे काही जादूची कांडी नाही. तुम्ही सहकार्य करा मी सहकार्य करतो नाहीतर मी जातो. मग करा कोणाला पालकमंत्री करायचे तर असे म्हणत विकासाच्या प्रश्नावर उतावळी झालेल्या बीडकरांबाबत नाराजी देखील व्यक्त केली. अजित पवार यांनी सहा वाजल्यापासूनच दौऱ्याला सुरुवात केल्याने प्रशासकीय अधिकारी कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडालेली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बसूबारस निमित्ताने शेतक-यांनी केली गो धनाची पूजा

Shahapur : जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव; नवीन राजपत्राप्रमाणे खास ग्रामसभेत ठराव मंजूर

Railway Station Update : मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्टेशनचं नामांतर; नावात काय केला बदल? जाणून घ्या

महिलांशी अश्लील संभाषण करतानाचा ऑडिओ लीक, World Cup जिंकवून देणाऱ्या कर्णधाराला संघातून हाकललं

Mumbai To Ram Mandir Travel: जय श्री राम! मुंबईवरून राम मंदिर कसे पोहोचावे? जाणून घ्या सर्वौत्तम मार्ग

SCROLL FOR NEXT