Deputy CM Ajit Pawar addressing the media about the Manikrao Kokate rummy video controversy. Saam Tv
Video

Ajit Pawar: ‘एकदा झालं, दोनदा झालं, आता...; माणिकराव कोकाटेंबद्दल अजित पवार नेमकं काय म्हणाले? VIDEO

Manikrao Kokate: मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त रम्मी व्हिडिओवर अजित पवारांनी मौन सोडले. त्यांनी सांगितले की, सोमवारी कोकाटेंशी भेट घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल.

Omkar Sonawane

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त रम्मी व्हिडिओवर मौन सोडत प्रतिक्रिया दिलीय. मला मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार सभागृहाच्या आत घडलेला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे. त्यांनी या प्रकरणी चौकशी लावली आहे, अशी माझी माहिती आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार पुढे म्हणाले, सध्या मी कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्यामुळे यावर फारसं बोलणं झालेलं नाही. कोकाटेंनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपलं स्पष्टीकरण दिलं आहे, मात्र अजून आमची भेट झालेली नाही. सोमवारी मी स्वतः कोकाटेंची भेट घेणार आहे.

राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही सर्व मंत्र्यांना जबाबदारीची जाणीव ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कोकाटे पहिल्यांदा बोलले तेव्हा त्यांना समज दिली होती. पण आता एकदा झालं, दोनदा झालं. त्यामुळे आता त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यातील बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी होणार मतदान

UPI New Feature VPA: पैसे ट्रान्सफर होतील झटपट; अकाउंट नंबर नसला तरी पाठवता येणार पैसे

लातूर हादरलं! मेडिकलमध्ये औषध आणायला गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Shocking : चालक आणि नर्सच्या प्रेमाचा धक्कादायक शेवट! गर्लफ्रेंडनेच कुऱ्हाडीने वार करून बॉयफ्रेंडला संपवलं

Rice Eating Tips : दुपारी की रात्री; भात खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT