Ajit Pawar Death: पुरावे असताना कारवाई का नाही? मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात रोहित पवार आक्रमक
Ajit Pawar Plane Crash Case ncp mla rohit pawar demands FIR Against DGCA latest marathi news pvm91
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे आक्रमक झाले आहेत. डीजीसीएविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात ते दाखल झाले आहेत. यावेळी रोहित पवार आणि अमोल मिटकरी पोलिसांवर चांगलेच संतापले. डीजीसीएविरोधात गुन्हा दाखल करण्यावरून रोहित पवार आणि पोलिसांमध्ये वाद झाला. सर्व पुरावे असताना कारवाई का होत नाही असा सवाल रोहित पवार यांनी केला. पोलिसांना पुरावे देताना रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे आक्रमक झाले. यावेळी पोलिस उपायुक्त हे देखील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात आले. काय झालं, कसं झालं? याची माहिती मिळाली पाहिजे. विमान अपघातामध्ये आमचा माणूस गेला आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. या विमान अपघाताची माहिती सर्वांसमोर आली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. व्हीएसआर विमान कंपनीवर तात्काळ कारवाई होणं अपेक्षित असताना कारवाईला उशीर केल्याने आणि कंपनीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना कारवाई का केली गेली नाही असा सवाल करत रोहित पवार यांनी डीजीसीएविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.