Sharad Pawar Ajit Pawar saam tv
Video

Ajit Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार थेट बोलले, VIDEO

Ajit Pawar - Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबतच्या चर्चेवर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. वरिष्ठ पातळीवर याबाबत काहीही चर्चा झालेली नाही, असं ते म्हणाले.

Nandkumar Joshi

राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठे भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात होती. एकीकडं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा होती. तर दुसरीकडे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. त्यावर शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं. यावरून राजकीय वर्तुळातील सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. शरद पवार यांच्या वक्तव्यावर आता अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

आगामी काळात पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी शरद पवार यांनी तसं वक्तव्य केलं असेल, असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित नेत्यांना अजित पवार यांनी तसं सांगितलं. सध्याच्या घडीला दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा झाली नाही, असंही स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT