Ajit Pawar News Saam Tv
Video

Ajit Pawar : मोठी बातमी! अजित पवार अचानक 'नॉट रिचेबल', पोलीस ताफा सोडून नेमके गेले कुठे?

Ajit Pawar not reachable : पुणे महापालिका निवडणुकीतील जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले. पोलिस ताफा न घेता निघून गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar not reachable after Pune civic election talks : पुणे महापालिका निवडणुकीसाठी शरद पवाराची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपची चर्चा फिस्कटली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकारणात घडामोडींना वेग आलाय. अजित पवार पुण्यातील बारमती हॉस्टेलमध्ये मुक्कामी होते. पण ते अचानक कुणालाही न सांगता, पोलिसाचा ताफा न घेता निघून गेले. त्यामुळे पुण्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलेय. अजित पवार नेमके गेले कुठे असा सवाल बारामती अन् पुण्यात विचारला जातोय.

उपमुख्यमंत्री अजित बारामती हॉस्टेलमधून ज्या वाहनाने रवाना झाले ते वाहन पुण्यातील जिजाई या निवासस्थानी आढळले. पण उपमुख्यमंत्री अजित पवार जिजाई निवासस्थानी आहेत की नाहीत, याबाबत माहिती देण्यास कर्मचार्‍यांनी नकार दिला. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार बारामती हॉस्टेलमध्ये बैठका घेत होते. महापालिका निवडणूक जागावाटप अन् तिकिटवाटपावर चर्चा सुरू होत्या. पण आज सकाळी कुणालाही काहीही न सांगता अजित पवार तिथून निघून गेले. नेहमी सोबत असणारा पोलिसांचा फौजफाटा, पायलट कार आणि सुरक्षारक्षक यांचा ताफा हॉस्टेलच्या बाहेरच उभा राहिला. तिथून अजित पवार एकटेच निघून गेले. त्यामुळे चर्चेला उधाण आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : झोपेत आईच्या कुशीतून उचलले, छाती आणि दोन्ही हात खाल्ले; नागपुरात प्राण्याच्या हल्ल्यात ८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

Mahila Rojgar Yojana: या सरकारी योजनेत महिलांना मिळतात ₹१०,०००; अर्जासाठी उरले शेवटचे ३ दिवस; स्टेप बाय स्टेप करा फॉलो

Ajit pawar : शरद पवारांसोबत युती करायचीच, आता अजित पवार स्वत: मैदानात उतरले; राष्ट्रवादीतील मोठी अपडेट समोर

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन मधून कृष्णराज महाडिक यांनी दाखल केला निवडणुकीचा अर्ज

Sleeveless Blouse Designs: स्लिव्हलेस ब्लाऊजची हटके स्टाईल, या 5 लेटेस्ट डिझाईन्स तुम्हाला उठून दिसतील

SCROLL FOR NEXT