Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana NCP- Shivsena  SAAM TV
Video

Ladki Bahin : 'लाडकी बहीण'ची जाहिरात; राष्ट्रवादीवर शिवसेना नाराज, काय खटकलं? VIDEO

NCP - Shivsena Dispute over Ladki Bahin Banner : लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षांत नाराजीची ठिणगी पडली आहे.

Nandkumar Joshi

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जाहिरात राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या जाहिरातीतील मजकुरात मुख्यमंत्री हा शब्द नसल्यानं सहकारी पक्ष शिवसेनेने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रातील अनेक योजना या पंतप्रधानांच्या नावानं आहेत. तसेच राज्यातीलही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावानं सुरू आहे. मात्र, आमच्या घटकपक्षाने प्रचार करताना मुख्यमंत्री हा शब्द वगळला. एक शब्द काय जड झाला होता का? असा सवाल करतानाच, शंभुराज देसाई यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.

आम्ही योग्य ते पालन करतो. आमच्या सर्व कार्यक्रमांत आम्ही सर्व नेत्यांचे फोटो टाकतो. मात्र राष्ट्रवादी पक्षाकडून तसं झालं नाही. असा दुजाभाव आम्ही केला नाही आणि करणारही नाही. मात्र, घटकपक्षांनी असं करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. अजित पवार यांच्याशी यावर बोलणं झालं नाही. पण त्यांची भेट घेऊन नक्कीच याबाबत चर्चा करू, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

Maharashtra Live News Update: आमदार चिखलीकर यांना भविष्यात मोठी जवाबदारी मिळणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले संकेत

भाजपप्रणित NDA ला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT