Eknath shinde vs ajit pawar Saam tv
Video

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंची डिमांड, अर्थ खात्यासाठी दादांची धडपड? पाहा स्पेशल रिपोर्ट

ajit pawar News : मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला असला तरी खातेवाटपावरून महायुतीतील धुसफूस सुरुच आहे. त्यातच आधी फडणवीसांकडील गृहखातं मागणाऱ्या शिंदेंनी आता आपला मोर्चा अजित पवारांच्या अर्थ खात्याकडे वळवलाय.... त्यामुळे दादांचं टेंशन वाढलंय... त्यामुळे अर्थखातं वाचवण्यासाठी दादांनी फिल्डिंग लावलीय.. ती नेमकी कशी? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही

महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून सुरु असलेली रस्सीखेच अखेर मिटली आणि देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली. मात्र भाजप गृहखातं सोडण्यास तयार नसल्याने शिंदेंनी अजित पवारांकडे असलेल्या अर्थ आणि भाजपकडे असलेल्या महसुल खात्याची डिमांड केल्याची माहिती समोर आलीय...त्यामुळेच अजित पवारांनी अमित शाहांच्या भेटीसाठी दिल्लीत तळ ठोकला होता. मात्र दिल्लीत अमित शाहांची भेट न झाल्याने अजित पवारांना रिकाम्या हाताने माघारी परतावं लागलं....मात्र अजित पवारांच्या भाजपकडे कोणत्या मागण्या आहेत? पाहूयात....

दादांची भाजपकडे डिमांड काय?

आपल्याकडील अर्थ खाते कायम ठेवण्याची मागणी

शिंदे गटाइतकीच मंत्रिपदं राष्ट्रवादीला देण्याची मागणी

आपल्या पक्षाला महत्वाची खाती मिळावीत, यासाठी दादांचा आग्रह

शिंदे गटापेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला असल्याने खातेवाटपात झुकतं माप देण्याची मागणी

राजभवनवर सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी अमित शाहांच्या भेटीसाठी गेल्याचं वृत्त फेटाळलंय...

अमित शाहांसोबत बैठक न झाल्याने अजित पवारांच्या मागण्या शिंदे आणि फडणवीस मान्य करणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संजय काकडे यांची होणारी पत्रकार परिषद रद्द

सर्वात मोठी बातमी! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं मोठं विधान; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

सुटलेलं पोट झटक्यात जाईल आत! रात्री भात खाण्याऐवजी खा 'हा' 1 पदार्थ; वजन राहील नियंत्रणात

BJP Politics: भाजपला मोठा धक्का! युवा नेता थेट दुसरा पक्ष काढणार; राजकीय वर्तुळात खळबळ

Nandurbar : महाराष्ट्रातील दुर्गम पाड्यावर पहिल्यांदाच चमत्कार घडला! गावकऱ्यांसह लहान मुलं आनंदानं उड्या मारायला लागले

SCROLL FOR NEXT