Ajit Pawar last rites news saam tv
Video

Ajit Pawar passed away: अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता होणार अत्यंसंस्कार

Ajit Pawar last rites news: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरलीये. त्यांच्या अंत्यसंस्काराची वेळ निश्चित करण्यात आली असून उद्या सकाळी ११ वाजता अंतिम संस्कार होणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

बुधवारी सकाळी महाराष्ट्रातील जनतेसाठी एक वाईट बातमी समोर आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी आली. यावेळी अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. अजित पवार यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दरम्यान अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे.

तर अजित पवार यांचे भाऊ राजेंद्र पवार यांनी अजित दादांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती दिलीये. राजेंद्र पवार यांनी सांगितलं की, अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानला ठेवणार आहे. संध्याकाळी ४ वाजता पार्थिव ठेवलं गेलंय. तर उद्या सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार आहेत.

रात्री उशिरापर्यंत नागरिकांना पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे. उद्या सकाळी गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी पार्थिव गदिमा चौक, विद्यानगरी चौक पुढे विद्याप्रतिष्ठानचा आतील रस्त्याने मैदानावर नेण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT