Ajit Pawar funeral today emotional scenes from Baramati : दादा हरवला, याचं दुख कधीच भरून निघणार नाही, अशी प्रतिक्रिया बारामतीमधील लाडक्या बहिणींनी दिली. अजित पवार यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी जनसागर लोटलाय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक बारामतीमध्ये दादांना निरोप देण्यासाठी पोहचले आहेत. (Ajit Pawar last rites crowd in Baramati)
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यावर शोककळा पसरली आहे. दादा हरवला आहे, हे दुख कधीच भरून निघणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले, त्याची जाणीव झाली नाही. दादांचा मृत्यू झाला, यावर आमचा विश्वास नाही, अशी प्रतिक्रिया एका लाडक्या बहिणीने दिली.
अजित पवार यांनी तळागळातील लोकांना संधी दिली. असा नेता आता होणे नाही. हे दुख भरून काढण्यासारखे नाही. अजित पवार गेल्याचा विश्वास आम्हाला बसत नाही. आणखी काही असते तर विश्वास ठेवला असता पण दादा गेले यावर विश्वास बसत नाही. दादांना अखेरचे डोळे भरून पाहायचेय, असे अमरावतीच्या लता गावंडे म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.