Deputy CM Ajit Pawar addressing the media in Pune after Tanaji Sawant’s remarks on the land deal controversy. Saam Tv
Video

Maharashtra Politics: तानाजी सावंतांवर अजित पवारांचा पलटवार; म्हणाले “विनाशकाले विपरीत बुद्धी”|VIDEO

Ajit Pawar Slams Tanaji Sawant: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करत तानाजी सावंतांना प्रत्युत्तर दिलं आहे. “विनाशकाले विपरीत बुद्धी” असं म्हणत त्यांनी सावंतांवर टीका केली असून चौकशी सखोल व्हावी अशी मागणी केली आहे.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील गाजलेल्या जमीन व्यवहार प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणाऱ्या मंत्री तानाजी सावंत यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले, 'विनाशकाले विपरीत बुद्धी, आम्हाला काही बोलायचं नाही, कारण आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण करतो'. यासोबतच, त्यांनी जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर बोलताना सांगितले की, आपला या व्यवहाराशी थेट संबंध नसला तरी, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून, नोंदणी कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पार्थ पवार यांच्यावर बोलताना, त्यांनी चौकशीत सत्य समोर येईल असे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेचा विशेष पॉवरब्लॉक; अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या मार्गात बदल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

होय मी बाजीरावच, फडणवीसांची टीका, दादांचं प्रत्युत्तर

Maharashtra Live News Update: जास्तीत जास्त मतदान करावं; एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन

SCROLL FOR NEXT