Ajit Pawar Funeral Saam Tv
Video

Ajit Pawar Funeral: सुनेत्रा वहिनींना हात देत सुप्रिया सुळेंनी सावरलं, अजितदादांना अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; पाहा VIDEO

Ajit Pawar Death: अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये बुधवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होत आहेत. यावेळी अजित पवारांचे अंतिम दर्शन घेताना सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले.

Priya More

राज्याचे उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होत आहे. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी शेवटचे धार्मिक विधी केले. यावेळी संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर पवार कुटुंबातील सर्व सदस्यांनी अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतलं. यावेळी सुप्रिया सुळे वहिनी सुनेत्रा पवार यांना हाताला धरून अजित पवारांच्या पार्थिवाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी घेऊन आल्या. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना सावरलं. यावेळी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले. लाडका दादा सोडून गेल्यामुळे सुप्रिया सुळे मनातून खचल्या असल्या तरी देखील त्या संपूर्ण कुटुंबाला आधार देताना दिसल्या. यावेळी जड अंत:करणाने पवार कुटुंबीय अजित पवार यांना अंतिम निरोप देताना दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT