Deputy CM Ajit Pawar addressing the crowd at Rahimatpur, Satara moments after removing his turban and putting on a cap during his fiery speech. Saam Tv
Video

Ajit Pawar: फेटा काढला अन् टोपी घातली; अजित पवारांचं जोरदार भाषण, VIDEO

Ajit Pawar Fiery Speech In Rahimatpur Satara: सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार भाषण करत भाजपसोबतच्या युतीचा बचाव केला.

Omkar Sonawane

सातारा येथील रहिमतपूर येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार भाषण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार प्रकरणानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाषण केले. ते म्हणाले, मी नुसता बोलत नाही, मी करून दाखवतो, मी कामाचा माणूस आहे. सुनील माने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घरवापसी झाल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेशिवाय लोकांची कामे होत नाहीत असे सांगत त्यांनी भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी ४० हजार कोटी रुपयांपर्यंतचा खर्च वाढल्याचे ते म्हणाले. तसेच पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पीक कर्जमाफीची घोषणा करणार असल्याचे आश्वासन दिले. पण कर्जमाफीसारखी होणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले. विकासकामांवर भर देण्याचे आश्वासन देत सातारा मेडिकल कॉलेज आणि सैनिक स्कूलसाठी दिलेल्या निधीचाही त्यांनी उल्लेख केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast in Delhi: दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई, पुण्यासह देशातील अनेक प्रमुख शहरांना अलर्ट

Breast Shape Change: लग्नानंतर स्तनांचा आकार वाढतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सत्य

Delhi Red Fort Blast : दिल्लीतील स्फोटात ८ जणांचा मृत्यू, हाय अलर्ट जारी

Maharashtra Live News Update : मुंबई, पुण्यासह देशातील अनेक प्रमुख शहरात अलर्ट

Delhi Blast: दिल्लीत मोठा स्फोट, वाहनं पेटली; आग अन् धुराचे लोट; पाहा घटनेचा पहिला VIDEO

SCROLL FOR NEXT