plane crash saam tv
Video

Air India Plane Crash: मेडिकल कॉलेजमधील विमान धडकल्यानंतरचा व्हिडिओ समोर|VIDEO

Air India Flight Slams Into Hostel: एअर इंडियाचं हे विमान एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकलं. याचे भीषण फोटो समोर आले आहेत.

Omkar Sonawane

एअर इंडियाच्या विमानाने बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीला जोरदार धडक दिली होती, या भीषण अपघाताचे फोटो आता समोर आले आहेत. ही दुर्घटना आज दुपारी अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात घडली. माहितीप्रमाणे, टेकऑफ केल्यानंतर अवघ्या ५ मिनिटांत विमान थेट मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर कोसळलं.

अपघाताच्या वेळी इमारतीत काही डॉक्टर्स, कर्मचारी आणि वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते, अशी प्राथमिक माहिती मिळते. या हॉस्टेलच्या वरच्या मजल्यावर एक कॅन्टीन आहे, जिथे दुपारी अनेक विद्यार्थी जेवणासाठी येतात. नेमक्या त्या वेळेसच ही दुर्घटना घडल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

विमानाच्या धडकेनंतर इमारतीचा काही भाग कोसळला असून, दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

SCROLL FOR NEXT