Protesters block Ahilyanagar highway demanding immediate arrest of cow slaughter accused. Saam Tv
Video

अहिल्यानगरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचं रास्ता रोको आंदोलन, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा नेमकं काय घडलं|VIDEO

Ahilyanagar Cow Slaughter Protest Latest News: अहिल्यानगर नगर शहरातील महामार्गावर गाई कापल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनांनी महामार्गावर ठिय्या देत रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.

Omkar Sonawane

अहिल्यानगर महामार्गावर गाई कापल्यामुळे परिसरात तणाव निर्माण.

आमदार संग्राम जगताप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले.

आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आणि पोलिस तैनात.

आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे, अन्यथा आंदोलन सुरू राहणार.

अहिल्यानगर नगर शहरातून जाणाऱ्या नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर गाई कापल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनांनी महामार्गावर ठिय्या देत रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. घटनेनंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वातावरण तणावपूर्ण आहे. आंदोलनकर्त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत आरोपींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आमदार जगताप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

Hindu Festivals: रक्षाबंधन आणि भाऊबीजमध्ये काय फरक आहे?

Virat Kohli : लिलावापूर्वी करार करण्यास नकार, IPL 2026 मध्ये विराट कोहली RCB कडून खेळणार की नाही?

SCROLL FOR NEXT