sakal media group Saam Tv
Video

Book festival: अहिल्यानगरमध्ये सकाळ माध्यम समूहातर्फे प्रथमच भव्य पुस्तक महोत्सव! वाचनसंस्कृतीला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, VIDEO

Sakal Media Group: सकाळ माध्यम समूह आणि अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने सकाळ पुस्तक महोत्सवाचं आयोजन नगर शहरात आयोजित केले आहे. या पुस्तक महोत्सवाला नगरकर मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत आहेत.

Omkar Sonawane

"वाचाल तर वाचाल" हे वाक्य आपण अनेकदा ऐकले आहे. वाचनामुळे माणसाचा दृष्टिकोन व्यापक होतो आणि समजूतदारपणाही वाढतो. अनेक जण संघर्षमय जीवनाला सामोरे जात असताना पुस्तके वाचून प्रेरणा घेतात. अनेक स्वातंत्र्यसेनानी आणि समाजसुधारक यांच्या चरित्रांचा अभ्यास करून अनेकांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत.

हीच वाचनाची आवड वृद्धिंगत व्हावी आणि तरुणांना प्रेरणा मिळावी. या उद्देशाने सकाळ माध्यम समूहाने अहिल्यानगर येथे २१ ते २४ मार्च दरम्यान भव्य पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाला संपूर्ण राज्यभरातून तसेच नगरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या पुस्तक महोत्सवाला काँग्रेस नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली. तसेच ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, आमदार संग्राम जगताप, पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह अनेक साहित्यिक आणि राजकीय नेतेही उपस्थित होते.

चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अहिल्यानगरमध्ये प्रथमच असा भव्य साहित्यिक रंगमंच उभा राहिला असल्याने नगरकरांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT