Dhananjay Munde Speech SaamTv
Video

Dasara Melava : 'पंकजाताईंची ताकद कुणी संपवू शकत नाही'; धनंजय मुडेंचं भगवान गडावरून भावनिक भाषण

Pankaja Munde-Dhananjay Munde : भगवान भक्तीगडावर आज दुपारी पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती होती.

Saam Tv

12 वर्षांच्या तपानंतर दसरा मेळाव्याला आल्याने मी भारावून गेलो आहे. भगवान बाबांच्या दसरा मेळाव्याची परंपरा मुंडे साहेबांनी चालवली, त्यानंतर माझी बहिण ही परंपरा चालवते खूप चांगले वाटते. मी आणि माझी बहिण यांनी 12 वर्षे त्रास सहन केला. पण आता सर्व सुरळीत झाले आहे. आजही आपण संघर्ष करतोय तो स्वतः साठी नाही तर जनतेसाठी आहे. सर्वांनी एकत्र येत पंकजा मुंडे यांच्या मागे उभे राहावे लागेल, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. तर शिवरायांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य उभे केले ते कुणा एका जातीसाठी नव्हते, असे म्हणत त्यांनी जातीय राजकारणावर टीका केली आहे.

भगवान भक्तीगडावर आज दुपारी पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. यावेळी पहिल्यांदा धनंजय मुंडे देखील या मेळाव्याला उपस्थित आहे. त्यामुळे दोन्ही बहीण भाऊ एकत्र आल्याने या मेळाव्याला यंदा वेगळं महत्व प्राप्त झालं आहे. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी, 'आपले 12 वर्षे जमले नाही पण मी कधी दसरा मेळावा सुरू केला नाही. मनात सुद्धा आले नाही, कारण ज्यांना जो वारसा दिला तो त्यांनी पार पाडावा. माझ्या बहिणीला जेवढा आज आनंद होतोय त्या पेक्षा जास्त जमलेल्या लोकांना झाला आहे. एखादा नवीन मेळावा सुरू करत पंकजाताईंची ताकद कुणी संपवू शकत नाही. हात जोडून सर्वांना विनंती करतो आपण एकमेकांच्या सोबत राहणे गरजेचे आहे, असं भावुक वक्तव्य केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT