ATM Saam TV
Video

Agra : ATM मधून ५०० ऐवजी ११०० रुपये बाहेर, ५० लोकांनी घेतला संधीचा फायदा | VIDEO

ATM Glitch : एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ५०० रुपये ऐवजी ११०० रुपये बाहेर येऊ लागले. ५० लोकांनी या संधीचा अतिरीक्त फायदा घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आग्रा येथील एका एटीएममध्ये अनोखी गडबड घडली असून, ५०० रुपये काढण्याच्या विनिमयानंतरही ग्राहकांच्या हातात थेट ११०० रुपये येऊ लागले. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि काही वेळातच एटीएमबाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमू लागली.

एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. नागरिकांनी याचा चुकीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर पैसे काढले आहेत. प्राथमिक माहितीनुसार सुमारे ५० लोकांनी या संधीचा लाभ घेत अतिरीक्त रक्कम काढून घेतली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत एटीएम बंद करून गर्दी हटवली. बँकेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी येऊन चौकशी सुरू केली असून यामागील नेमका कारण शोधण्याचे काम सुरू आहे. बँकेच्या यंत्रणेला भेद देणारा हा प्रकार चर्चेचा विषय ठरतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT