Aditya Thackerey News SaamTv
Video

Mumbai Rain : 'इतकं भयानक चित्र कधीही पाहिलं नव्हतं'; आदित्य ठाकरेंनी सरकारवर ओढले ताशेरे

Aditya Thackerey : तुफान पावसामुळे बुधवारी मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुधवारी संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईची दैना उडवली. तुफान पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं.. पाणी साचल्यानं मुंबईकरांचे हाल झाले. सायन, कुर्ला चेंबूरच्या टिळकनगर मध्ये दोन ते तीन फूट पाणी साचले होतं. रात्री 1 वाजेपर्यंत पाणी भरलेलं होत. तर कुर्ला स्टेशन वर बेस्ट बस किंवा रिक्षा नसल्याने चाकरमनी पायी जात असल्याचे दृश्य दिसत होते. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

मुसळधार पावसामुळं मुंबई ठप्प झाली तेव्हा आपातकालीन यंत्रणा कुठे होती? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी टोळ्यांनी सगळी कंत्राटं वाटून घेतली आहेत असा आरोप केला. काही मिनिटांच्या पावसात मुंबई ठाणे पुणे या शहरांत लोकांचे हाल झाले. मुंबई ठप्प झाली. पहिल्यांदाच वेस्टर्न हायवे तुंबले, बीएमसीची यंत्रणा काल कुठे होती. दोन पालकमंत्री काल कुठे होते. या सरकारचं प्राधान्य खोके आणि पैशांना आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी ताशेरे ओढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT