Aditya Thackeray dream project saam tv
Video

Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्टवर 25 कोटी खर्च करून उखडून टाकणार|VIDEO

Aditya Thackeray's BKC Cycle Track to Be Demolished: आदित्य ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या सायकल ट्रॅकवर MMRDA 25 कोटी रुपये खर्च करून हातोडा चालवणार आहे.

Omkar Sonawane

महाविकास आघाडी सरकार असताना आदित्य ठाकरे हे पर्यावरण खात्याचे मंत्री होते. त्यावेळी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबई येथील बीकेसीत त्यांनी कोट्यवधी निधी मार्फत सायकल ट्रॅक उभारला होता. हा सायकल ट्रॅक 9.90 किलोमीटर लांबीचा आहे. मात्र आता MMRDA या सायकल ट्रॅकवर हातोडा चालवणार आहे. यासाठी MMRDA तब्बल 25 कोटी रुपये खर्च करणार असून कंत्राटदार नेमुणुकीची प्रक्रिया देखील सुरू केली आहे.

बीकेसीत तब्बल 10.8 किमी पदपथ आहेत. त्यालगत 9.9 किमी लांबीचे सायकल ट्रॅकही माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी उभारले आहे. यातील पदपथांची रुंदी 4 ते 7 मीटरपर्यंत तर सायकल ट्रॅक 1.5 ते 2.7 मीटर रुंदीचे आहेत. मात्र, दररोज बीकेसीत कामानिमित येणाऱ्यांची संख्या 6 लाखांवर पोहोचल्यामुळे गर्दीच्या वेळेत येथे वाहतूक कोंडी नेहमीची डोकेदुखी ठरत आहे. या परिस्थितीच सायन पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने ती वाहतूकही आता बीकेसीतून वळविली जात आहे. यामुळे MMRDA ने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

SCROLL FOR NEXT