लाडकी बहीण योजनेबाबत आज विधानसभेत चर्चा झाली. लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. तर बोगस लाभार्थ्यांवर कारवाई होार का असा प्रश्न विचारला जात आहे. यावर आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. ज्या सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यांच्याकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, असं आदिती तटकरेंनी सांगितलं आहे. त्यामुळे आता ज्या महिलांनी अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत.