Minister Aditi Tatkare addressing media on Ladki Bahin Scheme delay issue. Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचं अनुदान का रखडलं? अदिती तटकरेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या...VIDEO

Aditi Tatkare Update On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचं अनुदान रखडण्यामागचं कारण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तांत्रिक कारणांमुळे वेबसाइटवरील केवायसी प्रक्रियेत बदल होत असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलांना अनुदान वितरित केलं जाणार आहे.

Omkar Sonawane

‘लाडकी बहीण’ योजनेच्या अनुदानाला विलंब होत असल्याने लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या विलंबामागे तांत्रिक कारण असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आदिती तटकरे म्हणाल्या, 'ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे. किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे, किवा घटस्फोटीत असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाइटवर एक ऑप्शनच्या संदर्भात काम करत आहोत. योजनेच्या वेबसाइटमध्ये एकल महिलांसाठी केवायसी अंतर्गत कागदपत्रे अपलोड करण्याकरिता नवीन पर्याय जोडण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच अनुदान वितरित केले जाईल, असे आश्वासन आदिती तटकरे यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

सुक्या भाजीत मीठ जास्त झालंय? या ट्रिकने स्वाद होईल एका मिनिटात ठीक

कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर, चुटकी वाजवून महिला, पुरुषांवर उपचार

Maharashtra Politics: काका-पुतण्याची दिलजमाई? भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी एकत्र?

Maharashtra Live News Update: हिंगोलीत शिवसेनाविरुद्ध भाजप वाद शिगेला

SCROLL FOR NEXT