Video

अभिजीत दिपकेंना कुठे नेलं? पोलिसांवर अपहरण केल्याचा आरोप, CJP आंदोलक आक्रमक

CJP Tiranga March: दिल्लीमध्ये सीजेपी तिरंगा मोर्चा काढणार आहे. त्यापूर्वी पोलिसांनी अभिजीत दीपकेला ताब्यात घेतलं. यामुळे सीजेपी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Priya More

सीजेपीच्या तिरंगा मोर्चापूर्वी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली. दिल्लीत पोलिसांनी सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतलं. अभिजीत दीपकेंना ताब्यात घेतल्यानंतर सीजेपी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दिल्ली पोलिस अभिजीत दीपके यांना सोबत घेऊन कुठे गेले? पोलिसांनी दीपकेचे अपहरण केलं असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपकेला आंदोलनापूर्वी नोटीस बजावली होती. दीपके आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी पोलिस त्याच्या घरी गेले होते. त्यानंतर जसा तो घराबाहेर पडला तसं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिस व्हॅनमध्ये बसवून त्याला सोबत नेले.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सीजेपीला सेंट्रल पार्क येथे तिरंगा मोर्चा काढण्यास परवानगी दिली. पण सेंट्र्ल पार्कमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी फक्त ११ जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. सध्या सेंट्रल पार्क परिसरात सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून ते मोदी सरकारविररोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या, अन्यथा राज्यात पुन्हा आंदोलन! रोहित पवारांचा सरकारला इशारा

PM Kisan Yojana : खुशखबर! दसरा-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,००० येणार, महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Accident: मुंबईत एकाच रात्री दोन भयानक अपघात; रस्ता ओलांडताना तरुणीचा मृत्यू, डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा करूण अंत

दारूची बाटली, भरलेले पेग अन्...; शवविच्छेदन विभागात रंगली दारू पार्टी; पुण्यातील YCM रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

CJP Protest: 'सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवता येणार पण...' दिल्ली पोलिसांची CJP समोर ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT