8-YEAR-OLD BOY KILLED IN LEOPARD ATTACK IN JUNNAR MAHARASHTRA NEWS Saam Tv
Video

आईच्या डोळ्यादेखत बिबट्याने झडप टाकली, हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू|VIDEO

Leopard Attack In Junnar Taluka Pune: जुन्नर तालुक्यातील पारगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Omkar Sonawane

राज्यात बिबट्यांचे हल्ले थांबायचे नाव घेत नाहीये. मागच्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यात तर जुन्नर तालुक्यात गल्लोगल्ली बिबटे फिरत आहे. मात्र प्रशासन कुठलेही ठोस पाऊले उचलताना दिसत नाहीये. अशातच आज जुन्नरमधील पारगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भागात बिबट्याची दहशत वाढली असून, शिरूर आणि जुन्नर रस्त्यावर वारंवार हल्ले होत असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT