pandharpur news  saam tv
Video

Ashadhi Wari: श्रींच्या पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान, ७०० वारकऱ्यांचा सहभाग, विदर्भाच्या पंढरीतून वारीला सुरूवात|VIDEO

Shegaon to Pandharpur: पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे ५६ वे वर्ष असून वारकरी हरीनामाचा गजर करत मोठ्या भक्तीभावाने श्रींच्या पालखीला सामील होण्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे.

Omkar Sonawane

संजय जाधव, साम टीव्ही

शेगांव: पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे ५६ वे वर्ष आहे. श्रींच्या पालखीत जवळपास सातशे वारकऱ्यांसह, टाळकरी, वारकरी, पताकाधारी, हरीनामाच्या गजरात जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल नामाचा जप करत संत नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. एकादशीला भूवैकुंठ पंढरपूरच्या विठोबाची महायात्रा आषाढी, कार्तिकी, चैत्र व माघी अशा चार एकादशीला पंढरपूरला भरते.

जो नित्याने वारंवार पंढरपूरला जातो तो वारकरी होय. श्री संत गजानन महाराजांच्या पुनीत वास्तव्याने पावन झालेल्या शेगाव नगरीला विदर्भाचे पंढरपूर म्हणून गौरविल्या जाते. पंढरीनाथाच्या भेटीसाठी प्रत्यक्ष शेगावच्या योगी गजाननाने हजारो वारक-यांसह वारी केल्याचे दाखले मिळतात. त्यामुळे येथील वारीला असलेली परंपरा ही संतांनी दाखविलेल्या मार्गावर गेल्या ५५ वर्षापासून अव्याहतपणे जपली जात आहे.

ज्येष्ठ शुद्ध ७, २ जून रोजी महाराजांची पालखी सकाळी ७ वाजता विधिवत पूजन झाल्यानंतर विठूरायाच्या भेटीला मार्गस्थ होणार आहे. टाळ, मृदंग वाजत, गाजत, शेकडो वारकरी हातात भागवत धर्माची पताका व मुखी हरी नामाचा गजर करीत श्रींच्या पालखीसह पंढरीची वाट धरतात. श्रीच्या दिंडीमध्ये, पताकाधारी, गायक, मुंदगवादक, सेवेकरी अशा एकूण सातशे जणांचा समावेश राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT