250 crore construction scam Chhatrapati Sambhajinagar Saam TV Marathi
Video

महाराष्ट्रात खळबळ! PWD विभागात तब्बल २५० कोटींचा घोटाळ

250 crore construction scam Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम विभागात बोगस वर्क ऑर्डर आणि क्यूआर कोड गैरव्यवहारातून २५० कोटींच्या कामांवर संशय निर्माण झाला असून चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

fake QR code work order investigation Maharashtra : छत्रपती संभाजीनगरमधील बांधकाम विभागामध्ये बोगस वर्क ऑर्डरच्या माध्यमातून २५० कोटींच्या कामात घोटाळा झाल्याचा संशय आहे. क्यूआर कोड एकाचा आणि कंत्राट दुसऱ्यालाच दिल्याच्या गंभीर प्रकारावरून २५० कोटींच्या कामाची चौकशी होणार आहे. त्यासाठी बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. आता ही समिती चार आठवड्यात चौकशी करणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीतून मंजुरी मिळालेल्या कामांची बांधकाम विभागातून बोगस वर्कऑर्डर तयार करून कोट्यवधी रुपयांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या संशय आहे. बांधकाम विभागातील कामाचे क्युआर कोड एका नावाने, वर्कऑर्डर दुसऱ्या नावाने, असा प्रकार सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रकरणामुळे सरत्या आर्थिक वर्षात डीपीसीतून बाधंकाम विभागाकडे वर्ग झालेल्या निधीतील सुमारे १०० कोटींची कामे संशयास्पद झाल्याची चर्चा आहे. - तसेच यापूर्वी देखील असा प्रकार झाल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बोगसगिरीच्या रॅकेटमधून काही कंत्राटदार गब्बर झाले असून बांधकाम विभागातील टेंडर क्लार्क, विभागीय लेखाधिकारी, कार्यकारी अभियंता ही सगळी साखळी देखील यात गुंतलेली असण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हातनुर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीमध्ये १७,०२२ क्युसेक

Mulshi Waterfall : ५ ते १० मिनिटांच्या ट्रेकनंतर दिसतो 'हा' धबधबा, मुळशीजवळ लपलंय सुंदर ठिकाण

Famous Actor : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला चावला विषारी किडा; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Rain Alert : आजही मुसळधार पाऊस! पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट; मुंबईत पावसाची काय स्थिती? वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT