कल्पना करा की तुमचं अभ्यासात हुशार असणारं एक मूल आहे. या मुलाला मोठं होऊन अधिकारी व्हायचंय. जितका वेळ त्याच्यासोबत घालवता येईल तुम्ही घालवता. जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्या या बाळाला आपण द्याव्यात असं तुम्हाला वाटू लागतं, सगळं... प्रेम, माया, निरोगी आयुष्य असं सगळं...पण एक दिवस याच मुलाला एक दुर्मिळ आजार होतो. आता हे बाळ वाचू शकणार नाहीये...तुम्ही हवे ते प्रयत्न करता, काय करू आणि काय नाही असं म्हणत सगळ्या दवाखान्याचे चक्कर तुम्ही लगावता अखेर तो दिवस येतो ज्यादिवशी तुमच्या या बाळाला मृत घोषित केलं जातं...आता तुमची काय अवस्था असेल हे जगातला कुठलाही माणूस सांगू शकत नाही...तरीही कसंबसं सावरून तुम्ही उभं राहताय आणि मनावर दगड ठेऊन असा निर्णय घेताय ज्यामुळे तुमच्या या लाडक्या मृत बाळामुळे आणखी ४ जणांचे प्राण वाचणार आहेत...कल्पना करवत नाहीये ना? ही खरीखुरी घटना आहे. घटना कुठली, त्या बाळाचं नाव काय? त्या बाळाच्या त्या धाडसी आई वडिलांचं नाव काय? सगळं जाणून घेणार आहोत...फक्त video शेवटपर्यंत बघा
बाळाचं नाव वैदेही तानवडे, बाळ अवघ्या १२ वर्षांचं...वैदेही अभ्यासात फार हुशार. वयाच्या नवव्या वर्षी तिला एक दुर्मिळ आजार detect झाला. वैदेहीच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली...सगळं बाजूला सारून हॉस्पिटलच्या चकरा सुरू झाल्या. बाळाला वाचवण्याचे आतोनात प्रयत्न करण्यात आले. पण तरीही तो दिवस आला ज्या दिवशी वैदैहीची तब्येत ढासळत गेली. डॉक्टरांकडून आवश्यक ते सगळे प्रयत्न करण्यात आले पण वैदेही वाचली नाही. तिला मृत घोषित करण्यात आलं.
IPS व्हायची इच्छा असणारी वैदेही आता या जगात नाही.तानवडे कुटुंबाला मोठा धक्का बसला. अशा धक्क्यातून सावरायला किती दिवस लागतात हो? दिवस नाही वर्षे लागतात...या दु:खात असतानाच तानवडे कुटुंबाने एक धाडसी निर्णय घेतला. या निर्णयानंतर त्यांच्या बाळाच्या देहाची चिरफाड केली जाणार होती...पण आपल्या एका बाळामुळे आणखी मुलं वाचणार असतील तर? वैदेहीला ब्रेन डेड घोषित करण्यात आल्यानंतर तानवडे कुटुंबाने तिचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. वैदेहीने चार जणांचे प्राण वाचवले..आज तानवडे कुटुंबाची अवघ्या १२वर्षांची मुलगी... स्वतः जिवंत नाही, पण चार जणांच्या जगण्याचं मोल वाढवून गेलीय...
परळच्या ‘बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन’ इथे मेंदू मृत घोषित करण्यात आल्यानंतर १२ वर्षीय वैदेही तानवडेच्या आई वडिलांनी अवयव दानाचा निर्णय घेतला.वैदेहीच्या दोन्ही किडनी, यकृत आणि हृदय दान करण्यात आले.
वैदेहीची एक किडनी बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेनमध्ये ठेवण्यात आलीये,दुसरी केईएम हॉस्पिटलमध्ये गेली. तिचे यकृत मुंबईच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये तर हृदय चेन्नईच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. times news network च्या एका वृत्तानुसार वैदेहीच्या या एका निर्णयामुळे चार जणांना नवीन आयुष्य मिळालंय...
आपल्या मुलीचे अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याने वाडिया हॉस्पिटलने त्यांचं कौतुक केलंय...
मी मुलीसाठी चार वर्षे रुग्णालयात चकरा मारत आहे अवयवदानाची गरज असलेलेअनेक रुग्ण मी पाहिले आहेत. त्यामुळे माझ्या मुलीचा मेंदू मृत झाल्यानंतर अवयवदानास होकार दिला. माझी मुलगी देहाने सोबत नसली तरी अवयवरुपी जिवंत आहे. अवयव वाया जाण्यापेक्षा ते कुणाला तरी मिळाले, याचे मला समाधान आहे. असं वैदेहीची माऊली प्रणिता तानवडे फार समाधानानं सांगते...
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.