Vastu tips, Vastu shashtra for home Saam tv
वास्तु

Vastu tips : बाथरुममध्ये ठेवलेल्या या बादलीमुळे वाढू शकते आर्थिक संकट, वास्त्रुशास्त्रात सांगितले आहे महत्त्वाचे कारण

वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींची काळजी घ्या

कोमल दामुद्रे

Vastu tips : आपल्या घरात किंवा स्वयंपाकघरात अशा काही वस्तू असताता ज्या आपण वास्तूशास्त्रानुसार ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण घरातील अशा काही गोष्टी आहेत ज्या चुकीच्या पध्दतीने ठेवल्यास आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

हे देखील पहा -

वास्तूनुसार आपल्या घरात (Home) व आयुष्यात बाथरुमचे अधिक महत्त्व आहे. त्यामुळे तिथे ठेवलेल्या प्रत्येक गोष्टींचा आपल्या जीवनावर विशेष परिणाम होऊ लागतो. आज आपण जाणून घेऊया बाथरूममध्ये ठेवलेल्या रिकाम्या बादलीचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो.

बाथरूममध्ये कधीही रिकामी बादली ठेवू नका

अनेकदा लोक बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर बादली रिकामी ठेवतात. तर वास्तुशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये. असे केल्याने जीवनात आर्थिक संकट येऊ शकते. आपण आर्थिक संकटाचा सामना करत असू तर कधीही अशी चूक करू नका. प्रयत्न करा की बादलीत थोडेसे पाणी (Water) असले पाहिजे. याचा अर्थ असा होईल की आपल्या आयुष्यात आणि घरात पैशाचा ओघ राहिल.

बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली वापरा

वास्तुशास्त्रानुसार निळा रंग शनि आणि राहूचा अशुभ प्रभाव कमी करण्यास मदत करतो. जी व्यक्ती शनि आणि राहू दोषाने त्रास आहे त्यांनी बाथरूममध्ये नेहमी निळी बादली आणि निळा मग ठेवावा. यामुळे राहू आणि शनीच्या अशुभ प्रभावापासून बऱ्याच अंशी आराम मिळतो. याशिवाय जर तुम्हाला संपत्ती आणि आर्थिक ताकद मिळवायची असेल तर बाथरूममध्ये निळ्या टाइल्सचा वापर करा. यामुळे तुम्हाला काही वेळातच बदल दिसू लागतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:अण्णा हजारे उपचारासाठी मुंबईला हलवले

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

SCROLL FOR NEXT