स्पॉटलाईट

तुमचा मोबाईल नंबर आता होणार 11 अंकांचा...!

साम टीव्ही

मुंबई : आता तुमचा मोबाईल नंबर ११ अंकांचा होऊ शकतो, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियानं शुक्रवारी एक प्रस्ताव सादर केला. ज्यात ११ अंकांचा मोबाईल नंबर वापरण्याच्या सूचना केल्यात, ११ अंकांचा मोबाईल नंबर वापरल्यानं अधिकाधिक मोबाईल क्रमांकांची उपलब्धता देशात होऊ शकेल. १००० कोटी मोबाईल नंबरची क्षमता ११ अंकी मोबाईल नंबर झाल्यामुळे उपलब्ध होईल.

नियामकाने असेही सुचवले की लँड लाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी मोबाईल क्रमांकापूर्वी शून्य असणे आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त नवीन राष्ट्रीय क्रमांकाची योजना सुचविण्यात आली आहे. तसेच ट्रायने डोंगलसाठी वापरला जाणारा मोबाईल क्रमांक १० अंकी वरून १३ अंकांपर्यंत वाढवण्याचा सल्ला दिलाय.

म्हणजे लवकरच आपला १० अंकी मोबाइल नंबर ११ अंकांचा होणार आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत मोबाइल फोन ग्राहकांची वाढती संख्या पाहता ट्राय काही वर्षांपासून या प्रस्तावावर विचार करतंय.  दरम्यान देशात लवकरच लागू करण्यात येईल असा अंदाज आहे. 

हे ही वाचा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Chutney : महिलांच्या विविध आजारांसाठी गुणकारी चटणी; एकदा खाऊन तर पाहा

Agni Film : "अग्नी" चित्रपटात मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्रीही साकारणार प्रमुख भूमिका

Soyabean Price : सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; शेतकरी हवालदिल

Sambhajinagar: पाणीप्रश्न पेटला! वैजापूर तालुक्यातील 5 गावांतील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

Today's Marathi News Live : काँग्रेसने अदानी-अंबानीकडून किती पैसा घेतला? PM मोदींची टीका

SCROLL FOR NEXT