स्पॉटलाईट

Mr. Beardsome : महाराष्ट्राचा 'देखणा दाढीवाला' कोण होणार?

निलेश खरे

महाराष्ट्रातल्या राजकीय धुराळ्यासोबतच सध्या सोशल मीडिया फेसबुकवर एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेची धामधूम आहे. देखण्या दाढीवाल्यांची स्पर्धा. 

स्त्री ही सौंदर्याच्या बाबतीत नेहमीच सजग असते. म्हणून काही नाहीच केलं तरी स्वतःला गृहिणी म्हणवणारी बाईसुद्धा आयब्रोच्या निमित्ताने का होईना, पार्लरची पायरी चढतेच. म्हणजे सुंदर दिसणं हा स्त्रीचा स्थायी भाव आहे. तर आपण कसे दिसतो यावर दुर्लक्ष करणं हा 'भारतीय पुरूषांचा' स्थायी भाव असूच शकतो, इतकी कमालीची उदासिनता भारतीय पुरुषांमधे आढळते.  

'ऑन द अदर हॅन्ड' पुरुष लुक्सवर अजूनही फारसे लक्ष देत नाहीत. तब्येतीवर लक्ष नाही. लुक्सकडे लक्ष नाही. कपड्यांचा सेन्स नाही, निळा, पांढरा, काळा, ग्रे या पलीकडे कपड्यांचे रंग नाहीत. अशा दुष्टचक्रात आमचे अनेक बांधव अडकले आहेत. सुंदर स्त्री बघितल्यावर आपले मन जसे प्रफुल्लित होते, तसेच नीटनेटका, टापटीप हँडसम मनुष्य पाहिल्यावर कदाचित मुलींनासुद्धा छान वाटत असेल.

हा विचार मनात येऊन काही पुरुष लोक्स आजकाल दिसण्यावर भर देत आहेत. आपापलं जे काय कार्यक्षेत्र असेल त्यात उत्तम करण्याचा प्रयत्न असतानाच ही मंडळी दिसण्यावर ही फोकस करत आहेत ही तशी सुखद बाब आहे. मग डायट वर लक्ष, व्यायाम, चांगले कपडे वापरणे, परफ्युम /जेल वेग्रे, पार्लर ला कधीमधी भेट हे सगळं आलंच.

याचाच एक महत्वाचा भाग म्हणून निरनिराळ्या फॅशन येत असतात. सध्या दाढी वाढवण्याची फॅशन गेले काही वर्षे जोमात आहे. सोशल मीडिया हा त्याचा आरसाच.  

'नो शेव्ह नोव्हेंबर'चे निमित्त साधून Brewing Beard ह्या फेसबुक पेजमार्फत दरवर्षी फेसबुकवर देखणा दाढीवाला निवडण्याची स्पर्धा घेतली जाते. यंदाचे हे स्पर्धेचे चौथे वर्ष. ह्यावर्षी देखील ह्या स्पर्धेला जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 468 पुरुषांनीं ह्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत भाग घेतला आहे.  स्पर्धकांचे फोटो पेजवर अपलोड केले जातात.

फेसबुक युजर्स त्यांना आवडलेल्या फोटोला लाईक करून तसेच त्यावर रिऍक्ट होऊन आपले मत नोंदवू शकतात. आयोजकांनी काही परीक्षकसुद्धा नेमले आहेत. परीक्षकांचे 50% गुण आणि पब्लिक व्होटिंगचे 50% गुण यातून विजेता निवडला जातो. तसेच फक्त परीक्षकांनी दिलेल्या गुणांवर ज्युरी अवॉर्ड्स दिले जातात. विजेत्यांना Mr Beardsome ह्या किताबासोबत पाच हजार रुपये (प्रथम), तीन हजार रुपये (द्वितीय), एक हजार रुपये (तृतीय) अशी पारितोषिके दिली जातात.

दोन आठवड्यापूर्वी स्पर्धा चालू झाल्यापासून तीन लाखांपेक्षा जास्त फेसबुक युजर्सपर्यंत ही स्पर्धा पोचली आहे. सध्या गाजत असलेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' मालिकेत काम करणारी आदिती द्रविड ह्यावर्षीच्या स्पर्धेचे निवेदन करत आहे. नुकतेच तिने फेसबुक लाईव्ह येऊन स्पर्धेची माहिती दिली आणि स्पर्धेसंबंधी प्रश्नांना लाईव्ह उत्तरे दिली.

सोमवारी (ता.2) ह्यावर्षीचा Mr. Beardsome जाहीर होईल. सर्व महाराष्ट्राला ह्यावर्षीचा विजेता कोण होणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune PDCC Bank: मोठी बातमी! PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Live Breaking News: धाराशिवमध्ये ५५.४६ टक्के मतदान : कांही केंद्रांवर सांयकाळी सात नंतरही मतदान सुरू

Haryana Politics: हरियाणात भाजपला मोठा धक्का, 3 अपक्ष आमदारांनी सोडली साथ; सरकार अल्पमतात येणार?

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

SCROLL FOR NEXT