स्पॉटलाईट

VIDEO | शिवसेनेची अडचण करण्यासाठी भाजपची रणनिती, वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?

साम टिव्ही

महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी भाजप सोडत नाहीए. अशातच महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून भाजप आता आक्रमक झालीय.

अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना पोलिस मारहाण प्रकरणी झालेल्या शिक्षेच्या मुद्द्यावर आता भाजप आक्रमक झालीय. ठाकूर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय.

काय आहे प्रकरण?
मार्च 2012 मध्ये यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ कर्तव्यावर असलेल्या पोलिसाशी हुज्जत घातली होती. याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करणे, तसंच शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध त्यांनी मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर त्यांच्या शिक्षेला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. 

पाहा व्हिडीओ-

आता या प्रकरणावरून यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपने काँग्रेस आणि शिवसेना दोघांचीही अडचण करण्याची रणनीती आखलीय. त्याला उद्धव ठाकरे कसं उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असेल..अरूण जोशी, साम टीव्ही, अमरावती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Today's Marathi News Live: भाजपचे पुण्यातील उमेदवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे घेणार सभा

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

Marathi Manus : नोकरीत मराठी माणूस नको! का? संताप-राग-खंत... मराठी तरूणांच्या भावना आल्या उफाळून

SCROLL FOR NEXT