स्पॉटलाईट

VIDEO | सोमवारीच अपघात का घडतायत?

रामनाथ दवणे

गेल्या काही दिवसांपासून सोमवार हा लोकल प्रवाशांसाठी  घातवार ठरतोय. इतर दिवसांच्या तुलनेत सोमवारी रेल्वेचे सर्वाधिक अपघात होत असल्याचं समोर आलंय.

सोमवार म्हणजे प्रत्येक आठवड्यातील ऑफिसचा पहिला दिवस. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येकाचा वेळेत ऑफिसमध्ये उपस्थित राहण्याकडे कल असतो. मात्र हाच सोमवार लोकलमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या दृष्टीनं घातवार ठरतोय. लोकलमधून पडून अपघाताच्या  घटना सोमवारी सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास सर्वाधिक असल्याचं समोर आलंय. याला कारण ठरतेय ती सोमवारी लोकलला होणारी प्रचंड गर्दी.

सोमवारच्या दिवशी इतर दिवसांच्या तुलनेत 25 ते 28 लाख अधिक प्रवासी लोकलने प्रवास करतात. साधारणता दरदिवशी मुंबईच्या लोकलमधून 82 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र सोमवारी हाच आकडा 30 टक्क्यांनी वाढून प्रवासी संख्या जाते थेट 1 कोटी 10 लाख प्रवाशांवर. सेंट्रल रेल्वेवर इतर दिवसाच्या तुलनेत सोमवारी 15 लाख प्रवासी वाढतात. वेस्टर्न रेल्वेवर दररोज सरासरी  37 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र सोमवारी 16 डिसेंबरला प्रवाशांची हिच संख्या 54 लाखांवर गेली होती.

आठवड्याच्या सुरुवातीला होणारी गर्दी घातवाराला कारणीभूत ठरतेय. त्यामुळं रेल्वेवरील ताण कसा कमी करता येईल. या दृष्टीनं सरकारनं उपाययोजना करण्याची गरज आहे. आणि प्रवाशांनीही एखादी ट्रेन गेली तरी चालेल...मात्र आपल्या जीवाची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण लोकल येत जात राहते. मात्र आयुष्य एकदाच मिळतं.

Web Title -  monday is accident day for many people.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचं 'पानीपत'; IPLमधील कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

SCROLL FOR NEXT