स्पॉटलाईट

प्रतिक्षा संपली, लस येणार! वाचा कसं आहे, सरकारचं लसीबाबतचं नियोजन?

साम टीव्ही

अवघं जग कोरोनावरील लसीची प्रतिक्षा करतंय. अशा परिस्थितीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी रविवारी भारतीयांना एक चांगली बातमी दिलीय. 

कोरोनावर जगभरात 150 लसींचं विविध टप्प्यात परिक्षण सुरू आहे. तर भारतात कोरोनावरील तीन लसी मानवी चाचण्यांच्या टप्प्यात पोहोचल्यात. त्यापैकी दोन लसी स्वदेशी बनावटीच्या असून जुलै 2021 पर्यंत देशातील 25 कोटी जनतेला कोरोनाची लस देण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य आहे. 

कोरोनाची लस आल्यानंतर त्याच्या वितरण प्रणालीसाठी देखील काम सुरु आहे. ते म्हणाले की, आमची प्राथमिकता आहे की देशातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस कशी दिली जाईल. कोरोना लसीच्या संदर्भात एक उच्चस्तरीय तज्ञांनी कमिटी देखील कार्यरत आहे

भारत बायोटेक आणि ICMR ची कोवॅक्सिन, जायडस कॅडिलाची जायकोव्ह-डी आणि सीरम आणि ऑक्सफोर्डची कोरोना वॅक्सिन यांचा समावेश आहे. या पैकी सीरमची लस जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होऊ शकेल असा अंदाज आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर सर्वप्रथम ती लस आरोग्य विभागीत कर्मचाऱ्यांना दिली जाईल. त्यानंतर वृद्ध आणि गंभीर आजारी रुग्णांना ती टोचली जाईल..त्यानंतर ती लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

नुकतच डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते 28 सप्टेंबरला वॅक्सिन पोर्टलचं उदघाटन करण्यात आलं. या पोर्टलवर कोरोना लसींशी संबंधित सर्व माहिती दिली जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

SCROLL FOR NEXT