vinyak mete
vinyak mete 
स्पॉटलाईट

बीडमध्ये 5 जूनला भव्य मोर्चा,आमदार विनायक मेटेंनी दिली माहिती

विनोद जिरे

बीड -  पुन्हा एकदा मराठ्यांचा एल्गार ठरला असून याला बीडमधून Beed सुरुवात होणार आहे. आमदार MLA विनायक मेटे Vinyak Mete यांनी याविषयी माहिती बीडमध्ये पत्रकार परिषद Press Conferance घेऊन दिली आहे. ते म्हणाले, की मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर, 16 तारखेला मराठा आरक्षणासाठी Maratha Reservation मोर्चा Morcha काढणार होतो. मात्र या सरकारने मराठ्यांचा असंतोष दिसू नये, मराठ्यांनी आंदोलन Andolan करू नये, रस्त्यावर उतरू नये. यासाठी लॉकडाऊन वाढवला आहे. मात्र येणाऱ्या 5 तारखेला आरक्षणासाठी भव्य मोर्चा बीडमध्ये काढणार आहोत.अशी माहिती आमदार विनायक मेटे यांनी यावेळी दिली. A grand march on June 5 in Beed MLA Vinayak Mete informed

तर याविषयी आम्ही 18 तारखेला प्रत्येक तालुक्याच्या कार्यालयाला इशारा निवेदन देणार आहोत.त्या दिवशी राज्यातील मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाहीत. तर या मोर्चाच्या नियोजनासाठी, कोरोनाचे नियम पाळून आता प्रत्येक गावात घोंगडी बैठका घेतल्या जाणार आहेत.अशी देखील माहिती आमदार मेटेंनी दिली आहे.

हे देखील पहा -

दरम्यान या मोर्चात मराठासह, धनगर, लिंगायत, ब्राम्हण, मुस्लिम, समाजाचे नागरिक देखील असणार आहेत.या समाजातील नेत्यांना एकत्र करून आम्ही आरक्षणाची लढाई लढणार आहोत. त्यामुळं हा मोर्चा सर्व समाजाचा असणार आहे. हा मोर्चा मूक नसून सरकारला धारेवर धरणारा असणार आहे.असा इशारा देखील आमदार विनायक मेटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून सरकारला दिला आहे.A grand march on June 5 in Beed MLA Vinayak Mete informed

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या निकालात अनेक बाबी विसंगत आहेत. अनेक राज्यात 50% पेक्षा जास्त  आरक्षण आहे. 102 च्या घटना दुरुस्ती वर शिवसंग्राम ने याचिका दाखल केली होती.यात केंद्राला पार्टी केलं होत की केंद्राने भूमिका स्पष्ट करावी. या संदर्भात राज्य सरकारला फेर विचार याचिका दाखल करा असे वारंवार सांगून देखील केले नाही पण केंद्र सरकार ने फेर विचार याचिका दाखल केली. जर या याचिकेवर सुनावणी झाली तर  आरक्षणाची लढाई 50 % जिंकली आहे असं म्हणावं लागेल.

तसेच सुप्रीम कोर्टाचा निकाल यापूर्वी राज्य सरकारने केलेला नोकर भरती मधील रखडलेल्या नियुक्त्या लवकरात लवकर द्यावेत तसेच आठ दिवसात जर EWS चे आरक्षण संदर्भात राज्याने सुधारित आदेश काढावा नाही तर शिवसंग्राम कोर्टात जाईल.असा इशारा मेटेंनी दिला आहे. A grand march on June 5 in Beed MLA Vinayak Mete informed

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Copper Ring: तांब्याची अंगठी धारण का करावी ? त्यांचे फायदे कोण कोणते ?

Today's Marathi News Live: शरद पवारांचा विश्वासू शिलेदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार?

Shruti And Santanu Break Up : ४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती हासन आणि शांतनू हजारिकाचा ब्रेकअप?, एकमेकांना इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो

Chilled Water: फ्रीजशिवाय थंड पाणी कसं प्यायचं?

Narendra Modi Sabha: भाजपकडून प्रचारसभांचा धडाका, PM मोदी दिवसभरात घेणार ४ सभा, कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी

SCROLL FOR NEXT