उच्च रक्तदाबाचा त्रास आहे? मग रोज पिस्ता खाल्ल्याने रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येते, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Pistachios for Blood Pressure : दररोज पिस्ता खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास नैसर्गिकरित्या मदत होते. तसेच, रक्तदाब योग्य पातळीवर राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
HOW DAILY PISTACHIOS HELP MANAGE BLOOD PRESSURE EXPERT OPINION
HOW DAILY PISTACHIOS HELP MANAGE BLOOD PRESSURE EXPERT OPINION saam tv
Published On: 

शरीराच्या आरोग्यासाठी पिस्ता हे अत्यंत फायदेशीर मानले जातात. त्यांचा अनेक प्रकारे त्याचा वापर केला जातो. स्वीट्स आसो किंवा आरोग्यासाठी. पिस्त्यामध्ये पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास आणि रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, पिस्त्यांमध्ये असणारे पोषक घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात, हे जाणून घ्या .

पोटॅशियमचे प्रमाण

पिस्त्यांमध्ये पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियमित करण्यासाठी एक महत्त्वाचे खनिजा आहे. आहारातील अतिरीक्त मिठचे होणारे दुष्परिणाम कमी करून रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यास पोटॅशियम मदत करते.

HOW DAILY PISTACHIOS HELP MANAGE BLOOD PRESSURE EXPERT OPINION
Healthy Cooking : फक्त १ तमालपत्र बदलेल भाताची चव आणि आरोग्य! जाणून घ्या जबरदस्त फायदे

रक्तवाहिन्यांसाठी उपयुक्त

पिस्त्यांमध्ये हे अमिनो आम्ल असते, ज्याद्वारे शरीर नायट्रिक ऑक्साईड तयार करते. नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्यांना आराम देण्यास आणि त्या रुंद करण्यास मदत करते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

अँटिऑक्सिडंट्स आणि निरोगी चरबी

पिस्त्यांमध्ये मोनोअनस्याचुरेटेड फॅट्स आणि शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात, जे ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ कमी करून रक्तवाहिन्यांचे संरक्षण करतात.

HOW DAILY PISTACHIOS HELP MANAGE BLOOD PRESSURE EXPERT OPINION
तणावामुळे श्वास घेण्यास अडचण येतेय? 'या' ३ तंत्रांचा वापर करा; नक्की मिळेल आराम

रोज किती पिस्ता खावेत?

तज्ज्ञांच्या मते, आरोग्यासाठी दिवसातून एक मूठभर म्हणजेच सुमारे ३० ग्रॅम पिस्ता खाणे योग्य मानले जाते. यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात.

टीप:

पिस्ते खरेदी करताना शक्यतो मीठ नसलेले किंवा कमी मीठ असलेले पिस्ते निवडावेत. जर तुम्हाला सुकामेव्याची ऍलर्जी असेल किंवा मूत्रपिंडाचा गंभीर आजार असेल, तर आहारात पिस्त्यांचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.