तणावामुळे श्वास घेण्यास अडचण येतेय? 'या' ३ तंत्रांचा वापर करा; नक्की मिळेल आराम

कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अनेकदा आपल्याला प्रचंड मानसिक ताण जाणवू लागतो. तणाव नियंत्रित करण्यासाठी अशी अनेक श्वासोच्छ्वास व्यायामपद्धती आहेत, ज्या मज्जासंस्थेला शांत करतात.
STRESS BREATHING DIFFICULTY? TRY THESE 3 TECHNIQUES FOR RELIEF
STRESS BREATHING DIFFICULTY? TRY THESE 3 TECHNIQUES FOR RELIEF SAAM TV
Published On: 

कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अनेकदा आपल्याला प्रचंड मानसिक ताण जाणवू लागतो. कधीकधी हा ताण इतका वाढतो की श्वास घेणे जड जाते, घाबरल्या सारखे होते आणि बेचैनी जाणवू लागते.अचानक आलेल्या या तणावामुळे अनेकांचे रक्ताभिसरण वाढते आणि पुढे जाऊन उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.

आयुष्यात जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते आणि तुम्हाला प्रचंड ताण जाणवतो,तेव्हा काही विशिष्ट श्वासोच्छ्वास तंत्रांचा वापर नक्की करा. यामुळे मन एकाग्र ठेवण्यास आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. तणाव नियंत्रित करण्यासाठी अशी अनेक श्वासोच्छ्वास व्यायामपद्धती आहेत, ज्या मज्जासंस्थेला शांत करतात.

तणावाच्या वेळी आपले शरीर 'फाइट अँड फ्लाइट' मोडमध्ये जाते. अशा वेळी श्वास घेण्याचा वेग खूप महत्त्वाचा असतो. तणावात श्वास घेण्याचा वेग मंद होतो, हृदयाचे ठोके वाढतात आणि मेंदू काम करणे बंद करतो. अशा परिस्थितीत मज्जासंस्थेला शांत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या श्वासोच्छ्वासवर नियंत्रण ठेवणे. योग्य पद्धतीने श्वास घेतल्याने मेंदू स्थिर होतो आणि शरीर पूर्ववत स्थितीत येते.

तणावाच्या स्थितीत श्वासोच्छ्वासाची ही ३ तंत्रे फॉलो करा:

डायफ्रामॅटिक ब्रीदिंग (पोटापासून श्वास घेणे)

शरीर रिलॅक्स करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. यामध्ये पोटापासून श्वास घेण्याचा प्रयत्न करा.त्यासाठी तुमचा एक हात छातीवर आणि दुसरा हात पोटावर ठेवा.आता वेगाने श्वास घ्या, जेणेकरून पोट फुगेल आणि छाती पूर्णपणे स्थिर राहील. त्यानंतर हळूहळू श्वास सोडा. श्वास घेण्याची ही पद्धत शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवते आणि शरीर नैसर्गिकरीत्या रिलॅक्स होण्यास मदत करते.

बॉक्स ब्रीदिंग

जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या मीटिंग किंवा प्रेझेंटेशनसाठी जाता अथवा एखाद्या प्रसंगी भावनिकदृष्ट्या खूप जास्त भारलेले असता, तेव्हा बॉक्स ब्रीदिंग उपयुक्त ठरते.श्वासोच्छ्वास नियंत्रित करण्यासाठी ४ सेकंदात वेगाने श्वास आत घ्या. त्यानंतर ४ सेकंद श्वास रोखून ठेवा.यानंतर पुढील ४ सेकंदात श्वास बाहेर सोडा. श्वास घेण्याची ही प्रक्रिया वेगाने पडणारे हृदयाचे ठोके शांत करण्यास आणि मेंदूला एकाग्र करण्यास मदत करते.

फोकस करण्यासाठी '४-७-८' तंत्र

श्वासोच्छ्वासवर नियंत्रण ठेवण्यासोबतच एकाग्रता वाढवण्यासाठी '४-७-८' तंत्राचा अवलंब करा. सर्वप्रथम नाकावाटे ४ आकडे मोजेपर्यंत श्वास आत घ्या. त्यानंतर ७ आकडे मोजेपर्यंत श्वास रोखून ठेवा. यानंतर तोंडावाटे हळूहळू ८ आकडे मोजेपर्यंत श्वास बाहेर सोडा. जेव्हा तुम्ही इतक्या लांब प्रक्रियेने श्वास घेता आणि सोडता, तेव्हा पॅरासिम्पाथेटिक नर्वस सिस्टम सक्रिय होते, ज्यामुळे शरीर रिलॅक्स होते आणि श्वासोच्छ्वास धीमा होतो.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही सल्ला घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com