ZIM vs IND 3rd T20 
Sports

ZIM vs IND 3rd T20: मराठमोळ्या ऋतु 'राज'चा रूद्रावतार; झिम्बाब्वेला दिलं १८३ धावांचे तगडं आव्हान

ZIM vs IND 3rd T20 : तिसऱ्या टी२० सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिलने तुफानी फलंदाजी करत झिम्बाब्वेसमार मोठं आव्हान ठेवलंय.

Bharat Jadhav

झिम्बाब्वे आणि भारतीय संघात तिसरा टी-२० सामना हरारे येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजीत बदल केला. मात्र हा बदल परिणामकारक ठरला नाही. मागील सामन्यातील शतकवीर अभिषेक शर्मा आज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. पण कर्णधार शुबमन गिल आणि मराठमोळ्या ऋतुराजच्या तडेखाबाज खेळाच्या जोरावार भारताने झिम्बाब्वेला विजयासाठी १८३ धावांचे आव्हान ठेवलंय.

भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. गिलने ३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४९ चेंडूत ६६ धावा केल्या. तर यशस्वी जयस्वाल (३६), अभिषेक शर्मा (१०), संजू सॅमसन (नाबाद १२) आणि रिंकू सिंह एक धाव करून नाबाद परतला. ऋतुराज गायकवाडने स्फोटक खेळी करत ३ षटकार आणि ४ चौकार मारत २८ चेंडूत ४९ धावा केल्या. अखेर टीम इंडियाने २० षटकांत ४ बाद १८२ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा आणि ब्लेसिंग मुझरबानी यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

दरम्यान, या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. प्रतिस्पर्धी संघाने दिलेल्या ११५ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या नाकीनऊ आले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेसमोर २३५ धावांचे लक्ष्य ठेवले होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा पराभव झाला होता, असं करत या मालिकेत एक-एकने दोन्ही संघाची बरोबरी केलीय.

भारताचा संघ

शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: नागपुरात बडकस चौक मित्र परिवार तर्फे दहीहंडी स्पर्धेच आयोजन

Horoscope Saturday : गोपाळकाला जाणार या 6 राशींसाठी लाभाचा, प्रवासातून होईल फायदा; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Wall Collapse Tragedy : दर्ग्याची भिंत कोसळली; 5 जणांचा मृत्यू,आकडा वाढण्याची भीती

Mangalgad fort : पावसात ट्रेकिंगचा लुटा मनमुराद आनंद, 'मंगळगड' ची एकदा सफर कराच

PAN Card Security : पॅन कार्डचा गैरवापर कसा ओळखाल? आर्थिक फसवणुकीपासून वाचण्याचे सोपे उपाय

SCROLL FOR NEXT